दिवाळी स्पेशल खमंग कुरकुरीत चकली
चव परंपरेची, अस्सल कोल्हापुरी!
घरच्या घरी बनवा खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट चकली! योग्य प्रमाणात भाजलेली भाजणी आणि बनवण्याची योग्य पद्धत वापरली, तर चकली छान खुसखुशीत होते.

चकलीची भाजणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
(अंदाजे १ किलो भाजणीसाठी)
| साहित्य (Ingredient) | प्रमाण (Quantity) |
|---|---|
| तांदूळ | ५०० ग्रॅम |
| हरभरा डाळ | २०० ग्रॅम |
| मूग डाळ | १०० ग्रॅम |
| उडीद डाळ | ५० ग्रॅम |
| साबुदाणा | १०० ग्रॅम |
| पोहे | १०० ग्रॅम |
| हिरवे धणे | २० ग्रॅम |
| जिरे | २० ग्रॅम |
तांदूळ निवडताना ही गोष्ट लक्षात ठेवा!
चकलीची भाजणी बनवण्यासाठी जाड तांदूळ वापरणे उत्तम. शक्य असल्यास रेशनचा तांदूळ वापरा. तो उपलब्ध नसेल, तर जुना, पॉलिश न केलेला आणि किंचित पिवळसर रंगाचा तांदूळ वापरू शकता. इंद्रायणी तांदूळ वापरू नका.
भाजणी बनवण्याची योग्य पद्धत
स्टेप १ — धान्य स्वच्छ धुवा
तांदूळ, हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ वेगवेगळी स्वच्छ धुऊन घ्या. त्यातील पाणी पूर्णपणे निथळू द्या.
स्टेप २ — धान्य व्यवस्थित वाळवा
धुतलेले धान्य वेगवेगळे सुती कापडावर पसरवून ठेवा. थेट उन्हात वाळवू नका. घरात रात्रभर किंवा पंख्याखाली साधारण २–३ तास वाळवू शकता. धान्यावरील ओलावा पूर्णपणे निघणे महत्त्वाचे आहे.
स्टेप ३ — प्रत्येक पदार्थ वेगवेगळा भाजून घ्या
स्टेप ४ — थंड करून बारीक दळा
सर्व भाजलेले पदार्थ एकत्र करून साधारण १ तास पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर गिरणीतून अगदी बारीक दळून घ्या. तुमची चकलीची भाजणी तयार आहे!
चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य
(१ किलो भाजणीसाठी)
| साहित्य (Ingredient) | प्रमाण (Quantity) |
|---|---|
| चकलीची भाजणी | १ किलो |
| तेल | ९०–१०० ग्रॅम |
| ओवा | १ टीस्पून |
| काश्मिरी लाल तिखटकस्तुरी मसाले | ४ टीस्पून |
| तीळ | ४० ग्रॅम |
| मीठ | चवीनुसार |
| गरम पाणी | आवश्यकतेनुसार |
| तळण्यासाठी तेल | आवश्यकतेनुसार |
चकली बनवण्याची पद्धत
स्टेप १ — भाजणीमध्ये मसाले मिसळा
एका मोठ्या भांड्यात भाजणी घ्या. त्यात ओवा, मीठ, काश्मिरी लाल तिखट आणि तीळ घालून व्यवस्थित मिसळा.
स्टेप २ — गरम तेलाचे मोहन द्या
९०–१०० ग्रॅम तेल चांगले गरम करा. हे तेल भाजणीमध्ये थोडे-थोडे घाला. हाताने साधारण ३–४ मिनिटे चोळून भाजणीमध्ये तेल व्यवस्थित मिसळा.
स्टेप ३ — पीठ मळून घ्या
पाणी गरम करून घ्या. उकळी येऊ लागल्यावर गरम पाणी भाजणीमध्ये थोडे-थोडे घालत पीठ मळा. एकदम जास्त पाणी घालू नका. पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल नसावे. चकलीच्या साच्यातून सहज बाहेर येईल, इतके मऊ पण व्यवस्थित आकार धरून राहील, असे पीठ तयार करा.
स्टेप ४ — चकलीचा आकार द्या
चकलीच्या साच्यात पीठ भरा. स्वच्छ पृष्ठभागावर किंवा ताटात गोलाकार चकल्या पाडून घ्या. चकली तुटणार नाही आणि तिचा आकार व्यवस्थित राहील, याची काळजी घ्या.
स्टेप ५ — चकल्या तळून घ्या
कढईमध्ये चकल्या पूर्ण बुडतील इतके तेल गरम करा. तेल मध्यम तापमानाला आल्यावर चकल्या हळूहळू सोडा. चकल्या मध्यम आचेवर तळा. तेल खूप गरम असल्यास चकल्या बाहेरून लवकर रंग पकडतील; आणि तेल पुरेसे गरम नसल्यास त्या जास्त तेल शोषू शकतात. त्यामुळे तेलाचे तापमान योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे. चकल्या छान कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढून थंड होऊ द्या.
खमंग आणि कुरकुरीत चकलीसाठी महत्त्वाच्या टिप्स
- धान्यावरील ओलावा पूर्णपणे काढून टाका.
- प्रत्येक पदार्थ योग्य वेळ आणि मंद आचेवर भाजा.
- भाजणी अगदी बारीक दळून घ्या.
- गरम तेलाचे मोहन भाजणीमध्ये व्यवस्थित मिसळा.
- पीठ मळताना पाणी थोडे-थोडे घाला.
- चकल्या मध्यम आचेवर तळा.
- चकल्या पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात साठवा.
❤️ कस्तुरी मसाले परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमची दिवाळी जावो आनंदाची, फराळ होवो चविष्ट आणि खमंग!
कस्तुरी मसाले — चव परंपरेची, अस्सल कोल्हापुरी!
या रेसिपीसाठी वापरा कस्तुरी मसाले

Kasturi Kashmiri Red Chilli Powder
Vibrant Color, Mild Heat
इतर पारंपारिक रेसिपीज (Related Recipes)

Kolhapuri Tambda Rassa
The legendary thin red mutton broth of Kolhapur, slow-simmered to extract deep marrow flavours.

Chicken Kolhapuri
Spicy chicken curry with a rich coconut base, caramelized onions, and pounded spices.

Vangyache Bharit
Rustic smoky roasted eggplant mash seasoned with spring onions and green garlic.
